google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

स्काऊट गाईड यांनी व्यसनमुक्तीसाठी अभियान राबवावे

राज्यपालांचे प्रतिपादन; भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे मुख्य आश्रयदाते म्हणून पदग्रहण झाले.

               राजभवन येथे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड अध्यक्ष संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पदग्रहण सोहळ्यात स्काऊट-गाईडचे राज्य मुख्य आयुक्त तथा क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी राज्यपालांना स्काऊट-गाईड प्रतिज्ञा दिली. यावेळी ना. बनसोडे यांच्या हस्ते राज्यपालांना स्काऊट स्कार्फ तसेच आश्रयदाते पदक प्रदान करण्यात आले.

             स्काऊट स्कार्फ परिधान केल्याने व्यक्तीला नम्रतेची आणि कर्तव्याची जाणीव होते. देशातील 47 लाख स्काऊट-गाईडपैकी 13 लाख सदस्य एकट्या महाराष्ट्राचे आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून राज्यात स्काऊट आणि गाईड्स यांनी युवकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी अभियान राबवावे, तसेच प्रत्येक स्काऊट व गाइडने एका तरी रोपाची लागवड करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

           स्काऊट्स व गाईड्सनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात तसेच ‘कोविड’ महामारी काळात चांगले काम केल्याचे नमूद करून शाळा महाविद्यालयांनी स्काऊट गाइडचे काम गांभीर्यपूर्वक करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

             आयुक्त डॉ. दिवसे यांनी स्काऊट-गाईड चळवळीचा इतिहास सांगितला. स्काऊट चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवले जाते. तसेच विश्वबंधुत्व भावनेचे संवर्धन केले जाते, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र स्काऊटच्या राज्य चिटणीस सारिका बांगडकर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!