क्रिडा व मनोरंजन
नेवासा येथील चक्री उपोषण स्थगित
हभप शिवाजी महाराज देशमुख यांचे नेतृत्वात उपोषण; तीर्थक्षेत्र विकास हाच नेवासकरांच्या व्यापार वृद्धीला पर्याय -हभप शिवाजी महाराज
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तीर्थक्षेत्र नेवासा शहरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणारे व अडथळे निर्माण करणारे रस्ते कायमस्वरूपी मोकळे करा या मागणीसाठी मंगळवारी दि. 17 जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन व चक्री उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर चक्री उपोषण स्थगित करण्यात आले.
नेवासा : तीर्थक्षेत्र नेवासा शहरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणारे व अडथळे निर्माण करणारे रस्ते कायमस्वरूपी मोकळे करा या मागणीसाठी मंगळवारी दि. 17 जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन व चक्री उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर चक्री उपोषण स्थगित करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व भक्त मंडळ व ग्रामस्थ तसेच समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या संयुक्त विद्यमाने सदर उपोषण सुरु करण्यात आले होते. तीर्थक्षेत्र विकास हाच नेवासकरांच्या व्यापार वृद्धीसाठी मुख्य पर्याय असल्याने नेवासकर समजून सर्वांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन गुरुवर्य हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यावेळी म्हणाले की, नेवासा शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणाऱ्या मुख्य रस्ते वाहतुकीस कायमस्वरुपी मोकळे करावे म्हणून दि. 22 डिसेंबर रोजी निवेदन दिले होते. पण आमच्या मागणीवर नगरपंचायत यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. याचा सरळ अर्थ असा की वारकऱ्यांच्या व माऊली भक्तांच्या कायदेशीर व न्याय्य मागणीचा कुठलाही विचार नगरपंचायत प्रशासन व इतर संबंधित विभागांनी केलेला नसल्याने नगरपंचायत या अकार्यक्षमतेचा आम्ही निषेध करत असल्याचे सांगितले.
नगरपंचायत नेवासा यांच्या चाल ढकलीच्या निषेधार्थ व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणारे सर्व हमरस्ते अतिक्रमण मुक्त करून रहदारीसाठी आठवड्यातील सर्व दिवसांसाठी खुले करावे या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान भक्त मंडळ, ग्रामस्थ, वारकरी व समर्पण फाउंडेशन यांच्यासह नेवासा नगरपंचायतच्या मुख्य चौकात बेमुदत धरणे आंदोलन व बेमुदत चक्री उपोषण सुरू करत असल्याचे डॉ. करणसिंह घुले यांनी यावेळी प्रास्ताविक करतांना सांगितले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अँड. बन्सीभाऊ सातपुते, अमृत फिरोदिया, जेष्ठ पत्रकार अशोक डहाळे, बालेंन्द्र पोतदार, संभाजी ठाणगे, अनिल ताके, दीपक धनगे, शांताराम गायके यांनी मनोगत व्यक्त करून उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी हभप लक्ष्मीनारायण जोंधळे, भाऊसाहेब माळवे, अशोक लोखंडे, ज्ञानेश्वर काळे, सुधीर चव्हाण, मोहन गायकवाड, रमेश शिंदे, शाम मापारी, नानासाहेब पवार, सुहास पठाडे, भैय्या कावरे, मिलिंद नागे, भागवत वाळुंजकर, शंकरराव तनपुरे, अनिल बोरकर, अंबादास लष्करे, पांडुरंग मते, कृष्णाभाऊ डहाळे, नवनाथ जाधव, संदीप आढाव उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष संदीप आलवणे, माजी उपसरपंच कृष्णाभाऊ डहाळे, मुंबादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पंडुरे, भाजपचे जिल्हासचिव अंकुश काळे, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, नगरसेवक सचिन नागपुरे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
तीर्थक्षेत्र नेवासा नगरीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपली वाहने घेऊन येथे दर्शनासाठी येत असतात मात्र येथील श्री खोलेश्वर मंदिरापासून ते नगरपंचायत चौक ते ज्ञानेश्वर मंदिर रस्ता या मार्गावर दुकाने लावल्याने अडथळे निर्माण होत असल्याने वाहन चालकांची तसेच भाविकांची ही मोठी कुचंबणा होत आहे ही मोठी समस्या भेडसावत असल्याने वारकरी व नागरिक यांनी यावेळी केले.
यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश दुबाले, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्याशी चर्चा केली. खोलेश्वर गणपती मंदिर ते ज्ञानेश्वर महाराज रस्त्यामधील अतिक्रमण दूर करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करा या भूमिकेवर हभप शिवाजी महाराज देशमुख व समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले हे ठाम होते. यानंतर नगरपंचायतसमोरील येणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने डिव्हायडर टाकण्याची कार्यवाही सुरू केली.
दरम्यान, सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेश दुबाले यांच्या लेखी आश्वासनंतर चक्री उपोषणाला स्थगिती देण्यात आली. दुबाले यांनी मंदिर रस्त्यावर अडथळा होणार नाही यासाठी डिव्हायर टाकले जाईल तसेच डिव्हायरपासून दोन्हीही बाजूस बारा मीटर आखून देण्यात येईल त्यासाठी कार्यवाही करता येईल, हातगाडी व फेरीवाले यांची बसण्याची वेगळी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.