google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रराजकिय

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; राष्ट्रपती भवनाकडून माहिती; 13 राज्यांचे राज्यपाल बदलले

                        स्वराज न्यूज नेटवर्क

दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याने, त्यांच्या जागी रमेश बैस राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून पदभार स्विकारणार आहेत. दरम्यान, 13 राज्य आणि व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले आहेत.

               छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने केल्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर “कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समामच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही”, असं विधान त्यांनी केले होते.

               राज्यपालांकडून केल्या गेलेल्या विधानांवरून महाविकास आघाडीने राज्यपालांविरोधात मोर्चाही काढला होता. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती आणि सातत्याने विरोधकांकडून ही मागणी केली जात होती.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!