ब्रेकिंग
नेवासा नगरपंचायत कारभाराच्या विरोधात दशक्रियाविधी
'मी नेवासकर' सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : ‘मी नेवासकर’ सामाजिक संघटनेच्या वतीने नेवासा नगरपंचायत व प्रशासनाच्या ठिसाळ कारभाराच्या विरोधात नगरपंचायतसमोर आज दशक्रिया विधी ( दहावा ) आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ‘मी नेवासकर’ सामाजिक संघटनेकडून आरोप करण्यात आला की, नगरपंचायतला वेळोवेळी निवेदने देऊन सुध्दा शहरातील कचरा व पाणी पुरवठयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहराला पंधरा ते वीस दिवसांतुन एकदाच पाणी पुरवठा केला जातो. पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे. शहरातील घनकचरा व आणि घाण लवकर उचलली जात नसुन घराघरात असलेल्या घाण कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरीकांना सोबत घेऊन मी नेवासकर सामाजिक संघटनेच्या वतीने शांताराम गायके, डॉ. करण घुले, विकास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा नगरपंचायत व प्रशासनाच्या विरोधात दहावा करुन निषेध व्यक्त केला.
या वेळी बाळासाहेब पाटील, रम्हुशेठ पठाण, राजेंद्र मापारी, अमृत फिरोदिया, गद्या पंडुरे, मिलिंद नागे, शिवा राजगिरे, राजु पवार, शिवाजी गायकवाड, चंदू घोडके, बबलू शेख, शशी मावसकर, मनेष चव्हाण, संदिप चव्हाण, आकाश चव्हाण, प्रकाश चव्हाण, गौरव चव्हाण आदी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.