google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवाशात नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

नगराध्यक्षसाठी ७ तर १७ नगरसेवकपदांसाठी ६३ उमेदवार रिंगणात; नगराध्यक्षपदाचे ४ तर नगरसेवकपदाचे २४ अर्ज मागे

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत नगरपंचायतीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (दि.२१) नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी तर नगरसेवक पदासाठी २४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार तर सतरा नगरसेवकपदासाठी ६३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पंचरंगी लढतीचे चिन्ह असताना आम आदमीच्या उमेदवाराने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने आता क्रांतिकारी, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशी चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे.
          नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सचिन विलासराव कडू (राष्ट्रवादी अजित पवार गट), करणसिंह भाऊसाहेब घुले (शिवसेना), अल्ताफखान ईमामखान पठाण (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), नंदकुमार लक्ष्मणराव पाटील (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), मनोज अंबादास पारखे (अपक्ष), दिनकर मोहन घोरपडे (अपक्ष), अश्पाक रशिद शेख (अपक्ष) हे सात उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत.
          नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये राजश्री प्रभाकर आहेर (शिवसेना), उज्ज्वला शेखर गव्हाणे (राष्ट्रवादी अजित पवार गट), जयश्री चंद्रकांत शिंदे (क्रांतीकारी शेतकरी पक्ष)
प्रभाग क्रमांक २ : छाया दिगंबर धायजे (शिवसेना), हेमा सिताराम सदाफळ (राष्ट्रवादी अजित पवार गट), शालिनी संजय सुखधान (आम आदमी पार्टी)
प्रभाग क्रमांक ३ : सुभाष बाबुराव टेमक (राष्ट्रवादी अजित पवार गट), अंकुश कचरु म्हस्के (शिवसेना), रणजित दत्तात्रय सोनवणे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष)
प्रभाग क्रमांक ४ : जितेंद्र भाऊसाहेब कुन्हे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), नितीन बबनराव जगताप (अपक्ष), विजय पोपट दहिवाळकर (शिवसेना), सचिन अशोक क्षिरसागर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
प्रभाग क्रमांक ५ : दिलीप लक्ष्मण फटांगरे (क्रांतीकारी शेतकरी पक्ष), श्रीकांत दादासाहेब बर्वे (राष्ट्रवादी अजित पवार गट), महेश शंकर लोखंडे (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्रमांक ६ : भारत मोहन डोकडे (राष्ट्रवादी अजित पवार गट), संभाजी शिवाजी धोत्रे (क्रांतीकारी शेतकरी पक्ष), विलास सखाराम बोरुडे (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्रमांक ७ : सुषमा गणेश कोरेकर (क्रांतीकारी शेतकरी पक्ष), अमृता श्रीकांत नळकांडे (भारतीय जनता पार्टी), भारती कृष्णा परदेशी (शिवसेना), रोहिणी अल्पेश बोरकर (राष्ट्रवादी अजित पवार गट), नंदा मधुकर सपकाळ (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ८ : रोहिणी बाबासाहेब मोरे (क्रांतीकारी शेतकरी पक्ष), कल्याणी सतीश लगे (राष्ट्रवादी अजित पवार गट), मेघा संदीप सरकाळे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ९ : अनिता आलवणे (आम आदमी पार्टी), माधुरी जाधव (राष्ट्रवादी अजित पवार गट), शीतल डहाळे (भाजपा), चंद्रकला बेहळे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष)
प्रभाग क्रमांक १० : अजितसिंग हरभजनसिंग नरुला (भाजपा), मणियार शेख खुर्शीद इसाक (अपक्ष), सागर राजेंद्र मापारी (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), इम्रान फारुख शेख (अपक्ष), प्रतीक राजेंद्र शेजुळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
प्रभाग क्रमांक ११ : अमित रमेश मापारी (भाजपा), शहीदाबी इलायतखान पठाण (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), जमशीद फत्तु पठाण (अपक्ष), आनंद रामचंद्र प-हे (अपक्ष), समीर शेख (अपक्ष)
प्रभाग क्रमांक १२ : सोनल राहुल चव्हाण (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), निता सुनील वाघ (भाजपा), जेनपबी रशीद शेख (अपक्ष)
प्रभाग क्रमांक १३ : मोहिनी कृष्णा डहाळे (भाजपा), अंजुम इमरान शेख (राष्ट्रवादी अजित पवार गट), नसरीन मुख्तार शेख (क्रांतिकारी), नसिमबानो गणीभाई शेख (अपक्ष)
प्रभाग क्रमांक १४ : गंगूबाई नानासाहेब दारूटे (शिवसेना), शुभांगी बाळासाहेब बेळे (अपक्ष), शोभा प्रताप व्यवहारे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), 
प्रभाग क्रमांक १५ : छाया पोपटराव कदम (राष्ट्रवादी अजित पवार गट), प्रतिभा जलिंदर गवळी (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), एस्तेर विल्यम गायकवाड (अपक्ष), गीता मनोज पारखे (भाजपा)
प्रभाग क्रमांक १६ : रविंद्र फूलचंद पिंपळे (राष्ट्रवादी अजित पवार गट), सचिन दिलीप बनसोडे (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), सचिन फिलिप वडागळे (भाजपा), प्रवीण शामराव सरोदे (अपक्ष)
प्रभाग क्रमांक १७ : अनिल भाऊसाहेब पवार (शिवसेना), रोहिदास अंबादास पवार (अपक्ष), अकुंश लक्ष्मण बड़े (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), अक्षय सुभाष मोरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) असे १७ प्रभागात ६३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
       महाविकास आघाडीने निवडणुकीतून सपशेल माघार घेतली असली तरी काँग्रेसने मात्र, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्ष मोठ्या ताकतीने उतणार असे वाटत असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय सुखधान यांनी माघार घेतली. पक्षाने नगरसेवकपदासाठी दोन प्रभागात आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप-सेनेत प्रभाग सातमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नगराध्यक्ष पदासह सोळा नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी पंधरा प्रभागात उमेदवार दिले आहेत.
         छाननीच्या दिवशी अचानक आलेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे एबी फॉर्म अवैध ठरलेल्या उमेदवारामध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शंकर लोखंडे, नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन नागपुरे, विवेकानंद नन्नवरे, डॉ निर्मला सांगळे, निखिल जोशी व सुवर्णा नागपुरे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने नगराध्यक्ष पदासह, प्रभाग तीन, चार, पाच, दहा व पंधरा मधील उमेदवारांना २५ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.
वेगळा झेंडा घेण्याची तीन शहर प्रमुखांवर वेळ
          भाजपचे नेवासा शहर मंडल अध्यक्ष मनोज पारखे व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख नितीन जगताप यांना पक्षाने उमेदवारी नाकारली त्यामुळे त्यांच्यावर अपक्ष उमेदवारीची वेळ आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे यांनाही उमेदवारीसाठी घड्याळ हाती घ्यावे लागले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!