google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

66 वा महापरिनिर्वाण दिन; सर्व राजकीय पक्षांच्या वतीने आदरांजली

                            स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : शहरातील नगरपंचायत चौकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात शहरातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

           या वेळी नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढोकणे, नगरसेवक सुनील वाघ, बसपाचे शहराध्यक्ष विकास चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन जाधव, वंचितचे तालुकाध्यक्ष हरीष चक्रनारायण, सतीश गायके, रणजित सोनवणे, प्रवीण सरोदे, तात्या केदाळे, ऋषभ तलवार, शांताराम गायके आदी प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

            या वेळी नगरसेवक सुनील वाघ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा तेवत असुन तो कधीही न संपणारा असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला सतीश म्हस्के, विल्यम गायकवाड, भवाळ मामा, डेव्हिड साळवे, संतोष चव्हाण, प्रकाश चव्हाण, शुभम चव्हाण, बिट्टू धनवटे, अरुण जाधव गृहरक्षक दलाचे संदीप म्हस्के, पेठे, प्रमिला श्रीखंडे तसेच अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!