google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे जखमी, दुचाकीची धडक

दुचाकीस्वार पसार; शासकीय कर्तव्य बजावताना घडली घटना

                           स्वराज न्यूज़ नेटवर्क
नेवासा : शासकीय कर्तव्य करत असतांना बाईक चालकाने जोराने धक्का दिल्याने डांबरी रोडवर पडून नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे हे जखमी झाले. ही घटना शनिवार (दि.3) रोजी दुपारी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.

            याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप रामा कु-हाडे (वय 46 वर्ष) यांनी म्हटले आहे की, दि. 03 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेचे सुमारास सरकारी वाहनातून शेवगाव पोलीस स्टेशनवरुन नेवासा पोलीस ठाण्याकडे पोलीस निरीक्षक विजय करे यांना घेवून येत असताना नेवासा फाटा ते नेवासा रोडवर ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर रस्त्यावर पांढरे रंगाची विना नंबरची बाईक व त्यावर दोघे जण बसून होते.

    मागील महिन्यात संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर घडलेल्या भांडणाच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस करणेकरीता करे यांनी गाडी थांबविण्यास सांगितले व गाडीतून खाली उतरुन त्यांचे विना नंबरचे वाहनाबाबत व येथे का थांबलात? याबाबत विचारपूस करीत असतांना सदर बाईकचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव न सांगता त्याने रेसर बाईक भरधाव वेगाने पळवून पोलीस निरीक्षक यांना जोराने धक्का देवून नेवासा खुर्दच्या दिशेने पळुन गेले. त्यावेळी पोलीस निरीक्षक हे डांबरी रस्त्यावर खाली पडून जखमी झाले. तेव्हा तेथे उपस्थित असणारे विदयार्थी त्यांना तेथून पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांनी सांगितले की गाडी चालवत असणारा अरमान जावेद बागवान (रा. नेवासा बुद्रुक) व त्याच्या पाठीमागे बसलेला इसम अरबाज रियाज सय्यद (रा. नेवासा खुर्द) असे दोघे होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक करे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

             सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अरमान जावेद बागवान रा. नेवासा बु ता. नेवासा व अरबाज रियाज सय्यद रा. नेवासा खु ता. नेवासा यांचे विरुध्द भारतीय दंड विधान कलम 353, 279, 337 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 50(1)/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!