राजकिय
शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
नेवासा फाटा येथे बैठकीचे आयोजन; ’शासन आपल्या दारी’ अभियान घरोघर पोहोचविणार
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : तालुकास्तरावर शिवसेना वाढविण्यासाठी, 23 एप्रिलपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियानासंदर्भात तसेच नवपदाधिकारी नियुक्तीबाबत आज नेवासा फाटा येथे शिवसेना पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली.
शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेशी नवीन सदस्य जोडणे, राज्य सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे, वंचित घटकांच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करणे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीमध्ये जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे, नेवासा तालुका प्रमुख संजय पवार, सुरेश डिके यांनी आपले विचार प्रकट केले.
नेवासा तालुका महिला आघाडीच्या मीराताई गुंजाळ, नेवासा शहर प्रमुख बाबा कांगुणे, उप शहर प्रमुख बंडू शिंदे, बापूसाहेब दारकुंडे, संदीप चाबुकस्वार, दिगंबर आवारे, मच्छिंद्र करंजे, बाळासाहेब पवार तसेच तालुका स्तरावरील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.