google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीमहाराष्ट्र

समग्र शिक्षा करार कर्मचाऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन

धडकणार नागपूर हिवाळी अधिवेशनावर; सहा हजारांवर कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत; कायम सेवेत समायोजन करण्याची मागणी

                            स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून सर्व शिक्षा अभियान व समग्र शिक्षा अभियानामध्ये जवळपास विविध केडरचे 6000 पेक्षा जास्त कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. यामध्ये विषय साधन व्यक्ती, विषय तज्ञ, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लेखा, इंजिनिअर, जिल्हा समन्वयक, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी असे विविध प्रकारच्या केडरवर सर्वजण प्रामाणिकपणे सेवा देत आहेत.
        
            कंत्राटी तत्त्वावर काम करत असताना व शिक्षण विभागाचा डोलारा सांभाळताना समग्र कर्मचाऱ्यांची मात्र सतत अवहेलनाच शासनाकडून झालेली आहे. कायम सेवेमध्ये अद्याप समायोजन झालेले तर नाहीच पण कमालीची महागाई वाढली असताना समग्र कर्मचारी यांच्या मानधनामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे समग्र कर्मचारी यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु याचे कोणालाही काही देणे घेणे नाही. एकतर नोकरीची शाश्वती नाही, तुटपुंजे मानधन यामध्ये सर्व समग्र कर्मचारी यांची कुचंबणा होत आहे.
        
             शासन व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या निदर्शनास या सर्व बाबी आणून देण्यासाठी सर्व समग्र कर्मचारी यांचे नियमित सेवेत समायोजन करण्यासाठी व सर्व समग्र कर्मचारी यांच्या मानधनात किमान 50% तात्काळ वाढ करणेसाठी व इतर मागण्याकरिता सर्व समग्र कर्मचारी यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर रोजी यशवंत क्रिकेट स्टेडियम, नागपूर या ठिकाणी करण्यात आले आहे.

                 या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व केडर समग्र कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाला आपली एकी दाखवून द्यावी, असे आवाहन समग्र शिक्षा करार कर्मचारी राज्य अध्यक्ष सर्व कॅडर, जिल्हा अध्यक्ष सर्व कॅडर व समग्र शिक्षामध्ये कार्यरत सर्व करार कर्मचारी बंधू भगिनी यांच्या तर्फे करण्यात आले आहे. मोर्चा नियोजनात संजय अकोले (नांदेड), लक्ष्मीकांत पाटोळे, हेमंत टेकाडे, सचिन बिनवडे नागपूर, अमित गावंडे (यवतमाळ), सुजाता सोनवणे (अमरावती) यांचे अथक परिश्रम सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सर्व समग्र कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने नागपूर मोर्चामध्ये उपस्थित राहावे. जेणेकरून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले मानधन वाढ व कायम सेवेमध्ये समायोजन हे प्रश्न मार्गी लागतील. -समी शेख, राज्य प्रसिध्दी प्रमुख.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!