google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

जुगार अड्ड्यावर छापा!

चापडगाव, ता शेवगाव येथील घटना 4,66,280 रुपयांच्या मुद्देमालासह 9 आरोपी ताब्यात; पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

                            स्वराज न्यूज नेटवर्क 
शेवगाव : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली की चापडगाव येथील गदेवाडीकडे जाणारे रोडवरील शेतातील शेडच्या आडोशाला काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत.
         
              पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पोलीस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता कुंदन संभाजी मडके (वय 30 वर्ष, रा सोनई सांगवी ता. शेवगाव), बाबासाहेब एकनाथ मस्के (रा. आखातवाडा ता. पैठण जि.औरंगाबाद), भगवान अर्जुन झिरपे (वय 47 वर्षे, रा. कोळगाव ता. शेवगाव) रामकिसन नारायण कोलाळे (वय 50 वर्ष, रा. गदेवाडी ता. शेवगाव), भगवान बापूराव झिरपे (वय 47, रा.  कोळगाव ता. शेवगाव), भगवान विष्णू ढाकणे (वय 43, वर्ष रा. हसनापूर ता. शेवगाव), बाप्पासाहेब त्र्यंबक विघ्ने (वय 40 वर्ष, रा. कोर्टाच्या मागे ता. शेवगाव), काकासाहेब भाऊसाहेब घोरतळे (रा बोधेगाव ता शेवगाव), विनोद दत्तात्रेय नेमाने (वय 30 वर्ष, रा. चापडगाव ता शेवगाव) यांच्या ताब्यातून  4,66,280/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सर्व आरोपी विरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे पो.कॉ.नितीन चव्हाण यांचे फिर्यादीवरून मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       
           सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, स.फौ. राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ सुरेश औटी, पो.कॉ नितीन चव्हाण, पोकॉ नितीन शिरसाठ आदींनी केली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!