google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

मद्यसाठ्यावरील कारवाईत 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

मागील वीस दिवसांत 101 आरोपींना अटक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

                             स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक 1 ते 20 डिसेंबर या कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 35 लाख 13 हजार 275 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा जप्त करण्याबरोबरच अवैध मद्यावर कार्यवाही करून 117 गुन्हे दाखल करत 101 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

             जामखेड येथील राजेवाडी फाटा बस स्थानकासमोर 20 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कार्यवाहीत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा व 1 वाहनांसह 6 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात अप्पासाहेब महादेव कुमटकर यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

              ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 1 ते 20 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील अवैध मद्यावर कार्यवाही करण्यात आली. या 117 गुन्हे दाखल करत 101 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कार्यवाहीत देशी-विदेशी मद्य व 11 वाहनांसह 28 लाख 83 हजार 275 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

              राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, पुणे विभागीय आयुक्त अनिल चासकर व अहमदनगर अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक जी.टी. खोडे, दुय्यम निरीक्षक डी.आर. ठोकळ, आर.पी. दांगट, टी.बी. करंजुले, पी.डी. गदादे, ए.ए. कांबळे, डी.ए. खैरे, एस.ए. पवार व सुनंदा अकोलकर हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

            नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मदयार्क, हातभट्टी दारु, ताडी इत्यादी निर्मिती व विक्रीवर कारवाईसाठी नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्यास बाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागास द्यावी. असे आवाहनही पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!