google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात नंबरची नवीन मालिका सुरु

एमएच 17 डीएफ ही नवीन मालिका

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
श्रीरामपूर : श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर (खाजगी) संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी एमएच १७ डीएफ ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
           यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व त्या क्रमांकासाठी शासकीय शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (डी.डी.) दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते ४:३० वाजे दरम्यान कार्यालयाच्या रोखपाल विभाग (खिडकी क्रमांक २०) येथे जमा करावा, आकर्षक क्रमांक अर्जासोबत अर्जदाराच्या पत्त्याच्या पुराव्याची व फोटो, ओळखपत्राची साक्षांकित प्रत देणे आवश्यक आहे, कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेचा किंवा शेड्यूल बँकेचा डिमांड ड्राफ्ट उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर यांच्या नावे काढून पसंती क्रमांक शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्ट द्वारे भरणे आवश्यक आहे. एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे हस्तांतरीत होणार नाही, तसेच रद्द करता येणार नाही.
           विशिष्ट आकर्षक क्रमांक आरक्षित करण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास अशा क्रमांकाची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर दि. ११ वाजता प्रदर्शित करण्यात येईल. क्रमांकाच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. १२ रोजी दुपारी ३ वाजता वाहनधारकास उपस्थित राहणे आवश्यक आहे. चारचाकी परिवहनेत्तर (खाजगी) वाहनांच्या आकर्षक क्र मांकासाठी परिवहनेत्तर चारचाकी वाहन मालिकेत असणाऱ्या शुल्काच्या तीनपट शुल्क भरून नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांक आरक्षित करता येतील. 
       सदर डीएफ मालिकेतील एकाच क्रमांकासाठी दुचाकी वाहन व चारचाकी वाहन यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास, सदर क्रमांकासाठी दुचाकी अर्जदार (दुचाकी वाहनासाठी शासकीय शुल्क अधिक लिलावासाठी प्राप्त झालेल्या अतिरिक्त डिमांड ड्राफ्ट रक्कम) व चार चाकी अर्जदार (चार चाकी वाहनांसाठी तीन पट शासकीय शुल्क अधिक लिलावासाठी प्राप्त झालेल्या अतिरिक्त डिमांड ड्राफ्ट रक्कम) यांपैकी ज्या अर्जदाराची एकूण रक्कम जास्त असेल अशा अर्जदारास तो क्रमांक देण्यात येईल. आकर्षक क्रमांकासाठी विहित केलेल्या शासकीय शुल्काबाबतची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात खिडकी क्र. २० वर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!