google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ता

प्रवरासंगम येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

संभाजीनगर - नगर महामार्गावर ओतले दूध; दूध मूल्य आयोगाची स्थापना करा; डॉ. ढगे यांची मागणी

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : तालुक्यातील प्रवरासंगम येथे श्री सिद्धेश्वर डेअरीसमोर छत्रपती संभाजी नगर व अहमदनगर या महामार्गावर दूध ओतून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 
              भारतातील इतर राज्यात केरळ, पंजाब, हरियाणा येथे दुधाला प्रति लिटर रुपये 40 भाव दिला जातो तथापि महाराष्ट्रात मात्र प्राप्त स्थितीत दुधाला प्रति लिटर रुपये सत्तावीस हा तटपुंजा दर दिला जातो. त्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी अशी मागणी आंदोलनाच्या वेळी डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली.
                 याप्रसंगी दूध संकलन केंद्राचे चेअरमन बापूसाहेब डावखर व दुग्ध उत्पादक शेतकरी संदीप फंड, राजेंद्र उदे, वामन खंडागळे, संजय डावखर, काकासाहेब मते, सोमनाथ खंडागळे, शंकर डावखर, शिवाजी मते, शिवप्रसाद मांढरे, स्वागत चव्हाण व यश डावखरसह अनेक शेतकरी उपस्थित होते. 
            आज महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यासाठी दूध मूल्य आयोगाचे संघटन करून त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रतिनिधी, दुग्ध शास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासनाचे सचिव, यांचा समावेश करावा. आज एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी 30 ते 32 रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही तोट्या मधील व्यवसाय शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यासाठी दूध भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी. शहरात मात्र दूध चढ्या दराने विकले जाते. तेव्हा हा मलिदा कोण खातो याचेही संशोधन व्हावे. रुपये पाच प्रति लिटर थकलेले अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी ही यावेळी दुग्ध उत्पादक शेतकरी व चेअरमन बापूसाहेब डावखर यांनी केली. 
               प्रवरासंगम येथे शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. जय जवान जय किसान, शेतकरी संघटनेचा विजय असो, दुधाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. अगदी दहा मिनिटांमध्ये हे चाललेले आंदोलन समाप्त करताना डॉक्टर ढगे म्हणाले की सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा तीव्र स्वरूपाची आंदोलने गोदाकाठी प्रवरासंगम परिसरात उभारण्यात येतील.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!