google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवाळीच्या दिवशीच काळाचा घाला

कार-पिकअप अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू; एसबीआय, नेवासा शाखेत दिली होती सेवा

                          स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : तालुक्यातील सौंदाळा येथे नेवासा-शेवगाव रोडवर झालेल्या कार व पिकपच्या अपघातात कुकाणा येथील माजी सैनिक मच्छिंद्र भाऊराव तांबे (वय 48 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना दिवाळीच्या दिवशी शुक्रवार दि.1 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

        याबाबत माहिती अशी की, कुकाणा येथील मच्छिंद्र भाऊराव तांबे (वय 48 वर्षे) हे भारतीय सेनादलातून निवृत्त होऊन सध्या अकोला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या सेवेत कार्यरत होते. शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीकरिता ते त्यांच्या मारुती कारमधून घरी येत होते. त्यावेळी सकाळी 5 वाजेच्या सुमारास सौंदाळा येथे त्यांची मारुती कार क्रमांक एमएच 17 सीएम 9818 व भेंड्याकडून नेवासाकडे जाणाऱ्या महेंद्रा पिकअप क्रमांक एमएच एजी 2909 ची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात कारमधील तांबे यांचा जागीच मृत्यू झाला.

       

              मच्छिंद्र तांबे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेवासा शाखेत दोन वर्ष सुरक्षा रक्षक म्हणून आपली सेवा दिली होती. मागील अडीच महिन्यांपूर्वी ते अकोला येथे आरोग्य सेवेत रुजू झाले होते.

           नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कुकाणा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!