google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बार उडाला

नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बार उडाला; 'या' तारखेला होणार मतदान; निवडणूक आयोगाची घोषणा; राज्यात आदर्श आचारसंहिता लागू

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे. बऱ्याच कालावधीनंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत.
               आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज (मंगळवारी) सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेतली. या निवडणुकीत २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. यातील २४६ नगरपालिकांमध्ये १० नवीन नगरपालिका आहेत. तर ४२ नगरपंचायतींमध्ये १५ नवीन नगरपंचायतीं आहेत, असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

                 यावेळी ते म्हणाले की, या निवडणुकीतून २८८ नगराध्यक्ष निवडले जाणार असून, ६८५९ सदस्य निवडले जाणार आहेत . यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येणार असून, त्याची प्रिंट आउट काढून निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. तसेच ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून, ७ नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तर १ कोटी ७ लाख इतके मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार असून, त्यामध्ये ५३ लाख २२ हजार ८७० महिला मतदार असतील. तसेच या निवडणुकांसाठी राज्यात १३ हजार ३५५ मतदान केंद्र असणार आहेत, असेही वाघमारे यांनी म्हटले.

              पुढे ते म्हणाले की, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी ०२ डिसेंबरला मतदान होणार असून, ०३ डिसेंबरला मतमोजणी होईल. तर उमेदवारांना उमेदवारी अर्ज १० नोव्हेंबरपासून दाखला करता येणार असून, १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. तसेच या अर्जांची छाननी १७ नोव्हेंबरला होणार असून, अर्ज माघारी घेण्याची तारीख २१ नोव्हेंबर असणार आहे. तर उमेदवारांना चिन्हाचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी केले जाईल, असेही निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. याशिवाय मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ३२ कॅम्पेन बनवण्यात आले असून, दिव्यांग मतदार, लहान बाळासह येणाऱ्या स्त्रिया, ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करु दिले जाईल. तर काही मतदार केंद्र गुलाबी केंद्र राहणार असून, त्यात सर्व अधिकारी या महिला असतील, असेही त्यांनी म्हटले.

नगरपालिका आणि नगरपंचायतींची सदस्य संख्या किती?

नगरपालिकांची सदस्यसंख्या ही २० ते ७५ असून, नगरपंचायतींची सदस्यसंख्या १७ आहे. तसेच नगरपालिकेची निवडणूक ही बहुसदस्य पद्धतीने असणार आहे. साधारण एका प्रभागामध्ये दोन जागा नगरपालिकेच्या जागा असतात. पण नगरपालिकेची सदस्य संख्या विषम असेल तर एका प्रभागात तीन जागा असतात.यावेळी मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावे लागणार असून, त्यात अध्यक्षाचाही समावेश असेल. तर नगरपंचायतीमध्ये एक सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. त्यामुळे तिथे मतदारांना दोन मते द्यावी लागतील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!