ब्रेकिंग
अशी होईल ‘नेवासा नगरपंचायत निवडणूक’
एकूण मतदार - 18 हजार 712; एकूण प्रभाग - 17; एकूण बूथ - 22; 'असे' होणार प्रभागनिहाय मतदान

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारांचे नामनिर्देश पत्र, एकूण बूथ, प्रभाग निहाय मतदान केंद्र क्रमांक, मतदान ठिकाण, अनामत रक्कम व निवडणूक खर्च मर्यादेची माहिती देण्यात आली.
उमेदवारांनी नामनिर्देशपत्र online पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाच्या www.mahasecelec.in या संकेतस्थळावर भरणे बंधनकारक आहे. नेवासा शहरातील सेतू केंद्र चालकांना नामनिर्देशन पत्र भरण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले असून उमेदवारांनी सेतू केंद्रामध्ये संपर्क साधावा. तसेच उमेदवारांना घरूनदेखील फॉर्म भरता येईल.
सदर निवडणुकीमध्ये मतदार संख्या १८७१२ असून महिला मतदार संख्या ९४२० तर पुरुष मतदार संख्या ९२९२ आहे. एकूण प्रभाग १७ असून सदस्य संख्या १७ असेल. थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण आहे. एकूण बूथ संख्या २२ आहे.
सर्व मतदान केंद्रांवर राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या किमान आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामध्ये पिण्याच्या पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांग मतदारांसाठी ramp. इत्यादी अनुषंगिक सुविधांचा समावेश आहे.
आदर्श आचारसंहितेचे पालन होऊन निवडणुका निर्भय वातावरणात व निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी FST, SST, VST व VVT या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवार अनु.जाती, अनु. जमाती अथवा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील असेल तर जातीच्या दाखल्यासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. वैधता प्रमाणपत्र नसेल तर जात पडताळणी समितीकडे प्रकरण सदर केल्याची पोहोच सादर करणे बंधनकारक, वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी शिफारस पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून देण्यात येईल.
नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांकरिता आवश्यक सूचक एक असणे गरजेचे आहे. तर नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांकरिता आवश्यक सूचक पाच असणे गरजेचे आहे.
निवडणुकीसाठी अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी एक हजार रुपये तर अनु.जाती, अनु.जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला उमेदवारांसाठी पाचशे रुपये अनामत रक्कम राहणार आहे.
निवडणूक खर्च मर्यादा ही नगराध्यक्ष पदासाठी सहा लाख रुपये तर सदस्य पदासाठी २,२५,०००/- रुपये निश्चित करण्यात आली आहे.
प्रभाग निहाय मतदान केंद्र क्रमांक व ठिकाण
प्रभाग १/१
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी शाळा मुली, (पाकशाळा) नेवासा खुर्द
प्रभाग २/१ व २/२
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले, नेवासा खुर्द
प्रभाग ३/१
सेंट मेरीज स्कुल, नेवासा खुर्द
प्रभाग ४/१ व ४/२
सेंट मेरीज स्कुल, नेवासा खुर्द
प्रभाग ५/१
सेंट मेरीज स्कुल, नेवासा खुर्द
प्रभाग ६/१
कै. सौ. बदामबाई धनराज शेठ गांधी विदया मंदिर, नेवासा खुर्द
प्रभाग ७/१ व ७/२
कै. सौ. बदामबाई धनराज शेठ गांधी विदया मंदिर, नेवासा खुर्द
प्रभाग ८/१
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले, नेवासा खुर्द
प्रभाग ९/१ व ९/२
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले, नेवासा खुर्द
प्रभाग १०/१
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी शाळा मुली, (पाकशाळा) नेवासा खुर्द
प्रभाग ११/०१
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी शाळा मुली, (पाकशाळा) नेवासा खुर्द
प्रभाग १२/०१
कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी माध्य व उच्च माध्य. कन्या विदयालय, नेवासा खुर्द
प्रभाग १३/०१
कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी माध्य व उच्च माध्य. कन्या विदयालय, नेवासा खुर्द
प्रभाग १४/०१ १४/०२
ज्ञानोदय इंग्लिश स्कुल, नेवासा
प्रभाग १५/०१
ज्ञानोदय इंग्लिश स्कुल, नेवासा
प्रभाग १६/०१
ज्ञानोदय इंग्लिश स्कुल, नेवासा
प्रभाग १७/०१
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले, मारुतीनगर नेवासा खुर्द.



