google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा शहरात अग्नितांडव !

दहा दुकाने जळून खाक; 46 लाख 39 हजार रुपयांचे नुकसान

                                       स्वराज न्यूज नेटवर्क 

नेवासा : नगरपंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेत दुकानांना बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत दहा दुकाने जळून खाक झाली तर शेजारील दुकानांनाही आगीचा मोठा फटका बसला आहे. या आगीत दुकानांचे 46 लाख 39 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील नगरपंचायत चौकातील व्यापारी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत शेजारी दुकाने रिकामे केल्याने अनेक दुकानाचे नुकसान टळले.
       दुकानांना आगीने वेढल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी ही मोठी गर्दी केली होती. दुकानांना लागलेल्या आगीनंतर उशिरा नगरपंचायत अग्निशमन बंब आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले पावणे अकरा वाजता भेंड़ा कारखाना येथील अग्निशमन बंब आल्यानंतर आग आटोक्यात आली.
           स्थानिक नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भीषण आगीसमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. नगरपंचायत प्रशासनाची अग्निशमन दलाची गाडी अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाली. मात्र, मध्येच पाणी संपल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. त्यामुळे अग्निशमन दलाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर इतर ठिकाणच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांना येण्यास वेळ लागल्याने तोपर्यंत आगीत शेजारच्या आणखी काही दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान, नेवासा नगरपंचायत प्रशासनाच्या अग्निशमन दलाच्या वाहनातील पाणी संपल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
          लागलेल्या या भीषण आगीत शिवाजी बाळासाहेब मोरे (सोडाशॉप) 4 लाख 20 हजार, योगेश दत्तात्रय औटी (सलुन) 3 लाख, अभिषेक राजेंद्र शेजुळ (कपड्याचे दुकान)15 लाख, मतीन मोहम्मद अतार (बेंगल आणि सिंगार) 15 लाख, सोहेल जहांगीर शेख व मुस्तकीम जहांगीर शेख (मोबाईल शॉप व गॅस शॉप) 6 लाख, अय्याज अस्लम मन्सुरी (बॅग हाऊस) 4 लाख 50 हजार, रुबिना नवाज मन्सूरी (स्वीट शॉप) 1 लाख 50 हजार, सुनिल रखमाजी बोरुडे (सलुन) 60 हजार, गणेश तुळशीराम निंबाळकर (केक शॉप)1 लाख 50 हजार या व्यापाऱ्यांचे एकूण 46 लाख 39 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!