google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रचाराची मुदत वाढली

रात्री दहापर्यंत करता येणार प्रचार

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर रोजी रात्री १० पर्यंत असेल.
            राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!