
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा विधानसभेकरिता २ लाख २६ हजार २९ मतदान झाले होते. शनिवारी दि.२३ नोव्हेंबर रोजी मुकींदपूर येथील शासकीय गोडावूनमध्ये मतमोजणी झाली. सकाळी ७ वाजता मतमोजणी निरीक्षक जे.एल.बी.हरिप्रिया, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत स्ट्रॉंग रूमचे सील तोडून ईव्हीएम मशीन (मतपेट्या) बाहेर काढण्यात आल्या.
सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण २७६ बुथची १४ टेबलावर २० फेऱ्यात मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या पहिल्या काही फे-यांपासूनचे लंघे आघाडीवर होते ते शेवटच्या फेरी अखेर आघाडीवरच राहिले.
उमेदवारांना पडलेली मते :
1) शंकरराव गडाख (उबाठा शिवसेना-मशाल) 91423
2) विठ्ठलराव लंघे (शिवसेना-धनुष्यबाण) 95444 विजयी
3) हरिभाऊ चक्रनारायण (बसपा-हत्ती) 805
4) पोपट सरोदे (-वंचित-गॅस सिलेंडर) 663
5) बाळासाहेब मुरकुटे (प्रहार-बॅट) 35331
6) कांबळे लक्ष्मण (अपक्ष-कपाट) 229
7) जगन्नाथ कोरडे (अपक्ष-बॅटरीटॉर्च) 433
8) मुकुंद अभंग (अपक्ष-ग्रामोफोन) 148
9) वसंत कांगुणे (अपक्ष-चिमणी) 194
10) शरद माघाडे (अपक्ष-ट्रम्पेट) 370
11) सचिन दरंदले (अपक्ष-फलंदाज) 420
12) ज्ञानदेव पाडळे (अपक्ष-सफरचंद) 545
13) नोटा 1723
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय बिरादार, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप, माध्यम समन्वयक संदीप गोसावी यांनी सहाय्य केले. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मात्र आघाडीच्या अपेक्षेप्रमाणे हा निकाल राहिला नाही. या निवडणुकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे अनेक मातब्बर नेते पराभूत झाले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा पराभूत झालेत.