
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : सोमवार (दि. २१) रोजी कामिका एकादशी निमित्ताने पैस खांबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे.
कामिका एकादशीनिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता नेवासा शहरातील वाहतूकीत असा बदल करण्यात आला आहे.
१) नेवासा फाटा ते श्रीरामपुरकडे जाणारे वाहनांकरीता मार्ग-
i) नेवासा फाटा- प्रवरासंगम- सिद्धेश्वर मंदिर- वाशिम टोका- गोधेगाव- भालगांव- नेवासा बु. – टाकळीभान- श्रीरामपुर.
२) श्रीरामपुर ते नेवासा फाटा ते शेवगावकडे जाणारे वाहनांकरीता मार्ग-
i) श्रीरामपुर- टाकळीभान- नेवासा बुद्रुक- भालगाव- गोधेगाव- वाशिम टोका- सिध्देश्वर मंदिर-प्रवरासंगम- नेवासा फाटा- शेवगाव.
वरील आदेश शासकीय वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.
भाविकांच्या वाहनांसाठी पार्कीगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नेवासा फाट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान, श्रीरामपुरकडून येणाऱ्या वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा, राहुरी-खुपटीकडून येणाऱ्या वाहनांसाठी खुपटी रोड वरील ईदगाह मैदान, केवळ दुचाकी वाहनांसाठी नेवासा शहरात एस.टी. स्टँड, पंचायत समिती मैदान आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, स्थानिक रहिवाशांनी २१ जुलै रोजी चारचाकी वाहनांचा उपयोग टाळावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
कामिका एकादशीनिमित्ताने श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज देवस्थान येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये, म्हणून नेवासा बस आगारातून नेवासा ते रामडोह, नेवासा ते गंगापूर, नेवासा ते कुकाणा, नेवासा ते घोडेगाव, नेवासा ते सोनई, नेवासा ते शेवगाव या मार्गावर जादा बसचे नियोजन केले आहे.



