google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजन

नेवासा बुद्रुक येथे चंपाषष्ठीच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी

खंडोबारायाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक; 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा गजर; खोबऱ्याची उधळण करत संत महंतांच्या हस्ते तळी भंडारा

                           स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबारायाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा असा जयघोष करत व संत महंतांच्या हस्ते तळी भंडारा करण्यात येऊन खोबऱ्याची उधळण करण्यात आली दिवसभरात लाखभर भाविकांनी खंडोबा म्हाळसादेवीचे दर्शन घेतले. चंपाषष्ठीच्या निमित्ताने मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती.
           नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा म्हाळसादेवी, बानूमाता मंदिरामध्ये खंडोबा भक्त संभाजी ठाणगे यांच्या अधिपत्याखाली सकाळी 9:30 वाजता हभप उद्धव महाराज मंडलिक, महंत सुनीलगिरीजी महाराज, गहिनीनाथ महाराज, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, कोंडीराम बाबा पेचे यांच्या हस्ते तळीभंडारचा कार्यक्रम झाला यावेळी नेवासा शहराचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, काकासाहेब शिंदे, अंबादास ईरले, संभाजी पवार, बाळासाहेब मारकळी, बदाम महाराज पठाडे, जानकीराम डौले, सुरेश लोखंडे, प्रसाद रहाट, अमृत रहाट, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत तळी भंडार चा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नव्यानेच बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक, हभप शिवाजी महाराज देशमुख, महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
           
           व्यासपीठ प्रमुख म्हणून हभप कोंडीराम महाराज पेचे, हभप विजय महाराज पवार यांनी सेवा दिली तर यावेळी श्री खंडोबा म्हाळसादेवी सच्चिदानंद बाबा व नारदमुनी  मंदिर स्ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.डॉ.मुरलीधर कराळे, उपाध्यक्ष एकनाथ रेडे, सचिव सर्जेराव चव्हाण, सहसचिव गोकुळनाना जायगुडे, विश्वस्त प्रभाकर बोरकर, सुभाष जपे, गणपत नळकांडे, अशोक मारकळी, रमेश काशीद, नामदेव कुटे, एकनाथ डोहोळे, रावसाहेब पेचे, सौ. रंजनाताई भाकरे या विश्वस्त मंडळींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
   
          चंपाषष्ठीच्या निमित्ताने पुरातन व नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा मंदिरातील मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोष करत अभिषेक घालण्यात आला. पुरातन खंडोबा मंदिरामध्ये मुख्य व्यवस्थापक संभाजी ठाणगे, पुजारी प्रसाद रहाट, अमृत रहाट यांनी सेवा देऊन उत्कृष्ट नियोजन केले.या दोन्हीही मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती.
   
        पुरातन मंदिराच्या बाजूस नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसादेवी मंदिरामध्ये ही भाविकांनी त्रैलोक्यस्वामी, नारदमुनी, भगवान दत्तात्रय, सच्चिदानंद बाबा यांचे दर्शन घेतले. याठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीने सप्ताहभर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंपाषष्ठी निमित्ताने पहाटे पासूनच येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी खंडोबा मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती. आलेल्या भाविकांना वांगे भरीत बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात आला. पुरातन खंडोबा मंदिरामध्ये वांगे भरीत प्रसादासाठी नेवासा येथील समर्पण फाऊंडेशनच्या वतीने डॉ. करणसिंह घुले यांच्या वतीने जळगाव येथील वांगे भरीत प्रसादासाठी  देण्यात आली.
चंपाषष्ठी उत्सवाचे महत्व लक्षात घेता खंडोबारायाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा सदाशिव लोखंडे, माजी मंत्री शंकरराव गडाख, मा आ बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट देऊन म्हाळसादेवी खंडोबादेवाचे दर्शन घेतले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!