google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

मा. खा. तुकाराम गडाख यांचे निधन

नेवासा तालुक्यावर शोककळा

                           स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नगर दक्षिणचे मा. खासदार व नेवासा- शेवगावचे मा. आमदार तुकाराम गंगाधर गडाख उर्फ भाऊ (वय 69 वर्षे) यांचे शुक्रवार (दि. 2) रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास निधन झाले.
               
                नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील मूळ रहिवाशी असलेले तुकाराम गडाख यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1953 सालचा आहे. गडाख यांनी तालुक्यातील ज्येष्ठ नेते स्व. मा आ मारुतराव घुले पाटील यांचा पराभव करून तत्कालीन नेवासा – शेवगाव विधानसभा मतदार संघाचे 1989 ते 1994 मध्ये अपक्ष आमदार बनले होते. तर 2004 ते 2009 त्यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
             
                शनिवार (दि. 3) रोजी दुपारी 12 वाजता नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. मा. खा. तुकाराम गडाख पा. यांच्या अकाली निधनाने नेवासा तालुक्यावरच नव्हे तर  नगर  जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!