राजकिय
पानेगावचा विकास बघून प्रभावित; गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील – चव्हाण
प्रशासक म्हणून सौ. चव्हाण यांच्याकडे कार्यभार
स्वराज न्यूज नेटवर्क
पानेगाव : नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाला असल्याने शासन नियमानुसार प्रशासक म्हणून नेवासे पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सौ. एस एन चव्हाण (लेंडे) यांनी कार्यभार स्वीकारला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पानेगाव : नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाला असल्याने शासन नियमानुसार प्रशासक म्हणून नेवासे पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सौ. एस एन चव्हाण (लेंडे) यांनी कार्यभार स्वीकारला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, शासन नियमानुसार प्रशासक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पानेगावचा विकास बघून प्रभावित झाले. गावामध्ये विकासाचे काम, व्यक्तिगत लाभाच्या योजना, घरकुल योजना आदी कामे ही पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून मला पानेगावसारख्या विकासाभिमुख गावात कामे करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो.
सौ. चव्हाण यांनी सांगितले की 18 वर्षे सेवेत पूर्ण होत असून पोलीस प्रशासनामध्ये निवड झाली असतानाही ग्रामीण भागातील काम करण्याचा मानस असल्याने पोलीस प्रशासनातील नोकरी नाकारुन पंचायतराज स्विकारले. सर्वांच्या सहकार्याने सामान्य घटकांपर्यंत तळागाळापर्यंत संधी मिळते हे खरे भाग्य असून पानेगावचा विकास बघून लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, उपसरपंच रामराजे जंगले ग्रामपंचायत सदस्य सौ. शांताबाई ज्ञानदेव गुडधे, सौ. लंका काकासाहेब जंगले, सौ. सुरेखा सतिश जंगले, सौ. पुष्पा रमेश जंगले, सौ. कमल संजय वाघमारे, सौ.रंजना दिगंबर जाधव, भाऊसाहेब काकडे, बाळासाहेब घोलप, ग्रामविकास अधिकारी संभाजी दौंड यांचे अभिनंदन केले.
यावेळी ‘मुळा’चे संचालक लोकनियुक्त सरपंच व करजगांव सह सोनई 18 गाव योजनेचे अध्यक्ष संजय जंगले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गावच्या विकासामध्ये मा. मंत्री शंकरराव गडाख, अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिलभाऊ गडाख यांचे मोठे योगदान लाभले असून पाच वर्षे माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबरच ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवला असून निश्चितच अभिमान असल्याचे सांगून भविष्यातही गावाच्या परिसराचा विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून आभार व्यक्त केले.
यावेळी मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, कै. पोपटराव संस्थेचे अध्यक्ष रमेश गुडधे, संचालक बाळासाहेब जंगले पानेगाव संस्थेचे संचालक राजेंद्र जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, सुनील चिंधे, बाबासाहेब शेंडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी संभाजी दौंड यांनी मानले.