google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

कै. पोपटराव पाटील संस्थेची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी- जंगले तर उपाध्यक्षपदी- काकडे; नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील अग्रगण्य संस्था

                                     स्वराज न्यूज नेटवर्क 
पानेगांव : नेवासे तालुक्यातील पानेगांव येथील ना. शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या कै. पोपटराव पाटील संस्थेची 2023-28 पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडली. 
           निवडणूक निर्णय अधिकारी एन के वनवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस व्ही ठोंबरे यांनी बोलावलेल्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर सोपान जंगले यांना सूचक ताराचंद घोलप, अनुमोदक अनिकेत जंगले उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब काकडे यांना सूचक बाळासाहेब जंगले, अनुमोदक गुलाब गायकवाड हे होते. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एन के वनवे यांनी जाहिर केले.
              यावेळी संस्थापक मुळाचे संचालक, लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, नूतन जेष्ठ संचालक बबनराव जंगले, अनिल जंगले, हितेश जंगले, संजय पवार, संध्या गुडधे, वच्छालाबाई गागरे, जनाबाई जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप, उपसरपंच रामराजे जंगले, भारत जंगले, द्वारकानाथ चिंधे, भाऊसाहेब काकडे, रघूनाथ जंगले, ग्रामविकास अधिकारी संभाजी दौंड, रमेश जंगले, शिवाजी जंगले, तानाजी घोलप, सतीश जंगले, गणेश जंगले, संपत गुडधे, बाळासाहेब जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे, बाबासाहेब शेंडगे, राहुल जंगले, डॉ काकडे, डॉ तुवर, मच्छिंद्र जंगले, विठ्ठल गागरे, निवृती जंगले, नानासाहेब जंगले, काकासाहेब जंगले, सुनिल सोनवणे, श्रीकांत जंगले, दिलीप गुडधे, गिताराम जंगले आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
            यावेळी मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे संस्थापक संजय जंगले यांनी सांगितले की, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील, ना. शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनीलभाऊ गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू असून सलग पंचवीस वर्षांपासून संस्थेची निवड बिनविरोध होत असून हा सभासदांचा मोठेपणा आहे. संस्थेचा लोकाभिमुख कार्यासाठी प्रत्येकाचे योगदान आहे. प्रथमच मोठ्या प्रमाणावर युवकांना संधी दिल्याने युवक वर्गातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे. 
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जंगले यांनी केले. प्रस्ताविक पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी तर संस्थेचे सचिव ए पी बोर्डे यांनी आभार प्रदर्शन केले. नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे अभिनंदन मा. मंत्री शंकरराव गडाख पाटील लोकनेते सुनील गडाख, युवा नेते उदयन गडाख यांनी केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!