google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

‘पदवीधर’साठी नेवासा तालुक्यात 55.40 टक्के मतदान

नगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान; मतदान प्रक्रिया सुरळीत संपन्न; 2 फेब्रुवारी रोजी फैसला

                              स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नेवासा तालुक्यात आठ मतदान केंद्रावर सरासरी 55.40 टक्के मतदान झाले. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
            नेवासा खुर्द येथील एकूण 1466 मतदानांपैकी 803 मतदान होऊन 54.77 टक्के, नेवासा बुद्रुक येथे 464 एकूण मतदानापैकी 264 मतदान होऊन 56.89 टक्के, सोनई येथे एकूण मतदान 1499 पैकी 835 होऊन 55.70 टक्के, घोडेगाव येथे एकूण 713 मतदानापैकी 448 मतदान होऊन 62.83 टक्के, चांदा येथील 667 मतदानापैकी 291 मतदान होऊन 43.62 टक्के, वडाळा बहिरोबा येथील 634 मतदानापैकी 356 मतदान होऊन 56.15 टक्के, कुकाणा येथे 1059 मतदानापैकी 583 मतदान होऊन 55.05 टक्के तर सलाबतपूर येथील 405 मतदानापैकी 246 मतदान होऊन 60.74 अशी टक्केवारी राहिलेली आहे.
            अहमदनगर जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावरही मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
        पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77  महिला अशा प्रकारे 58 हजार 283 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 2 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहितीही निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!