google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरीमहाराष्ट्र

फेब्रुवारी अखेरीस शिक्षक भरतीची ‘टेट’ परीक्षा

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; अर्जाचा कालावधी 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी

                               स्वराज न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.
         
            ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी असा असणार आहे. प्रवेश पत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा कालावधी 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार ऑनलाइन परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होणार आहेत.
              सदर परीक्षा एकूण दोनशे गुणांची असेल. परीक्षेसाठी अभियोग्यता घटकावर 60 टक्के भारांश तर बुद्धिमत्ता घटकावर 40 टक्के भारांश असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. परीक्षेचे शुल्क हे खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी 950 रुपये तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी 850 रुपये असणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ ही असणार आहे.
           
         
          या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!