राजकिय
मतदार सहायता कक्षाची स्थापना
मतदारांच्या तक्रारीच्या निवारणासाठी होणार मदत; नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार दि. 30 जानेवारी रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदार यादी, मतदान केंद्राच्या बाबतीत अडचणीचे निराकरण करण्यासाठी मतदार सहायता कक्ष स्थापन करण्यात आला असून कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0241-2347623 असा आहे.

या कक्षामध्ये निवडणूक शाखेच्या अव्वल कारकून श्रीमती छाया काळे व महसूल सहाय्यक भुषण मेढे या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचनाही या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.