google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कृषीवार्ता

पर्यावरण संवर्धनासाठी मधुमक्षिका पालन महत्त्वाचे

माणिक लाखे यांचे प्रतिपादन; कृषी विज्ञान केंद्राचे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण 

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : बदलत्या हवामानाचा शेती पद्धतीवर परिणाम होत असून पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत आहे. पिकाचे उत्पादन वाढीसाठी मधमाशी हा कीटक परागीकरण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. या बाबीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण तरुणांनी मधुमक्षिका पालन करून पर्यावरणाचे संवर्धन तसेच त्यापासून उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने हा व्यवसाय सुरू करावा म्हणून श्री मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव ने यांचे मार्फत दिनांक 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 
                  या प्रशिक्षणात ग्रामीण तरुणांनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षणामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांनी मार्गदर्शन केले, तसेच या सर्व तरुणांना मधुमक्षिका पालन व्यवसायाची ओळख व्हावी या दृष्टीने श्रीरामपूर येथील ऋषिकेश अवताडे यांच्या मधुमक्षिका पालन केंद्रास भेट देऊन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील संचालक, सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे यांनी या प्रशिक्षण आयोजनाच्या साठी मार्गदर्शन केले. 
               कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर श्याम सुंदर कौशिक यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. माणिक लाखे विषय विशेष विशेषज्ञ पीक संरक्षण यांनी सदर कार्यक्रमाचे संचालन केले. कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ सचिन बडदे, नंदकिशोर दहातोंडे, राहुल कावळे, नारायण निबे, डॉक्टर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी अनिल देशमुख, प्रवीण देशमुख, दत्तात्रय वंजारी, अनिल धनवटे, राम लांडगे, अंकुश क्षीरसागर यांनी मोलाची भूमिका बजावली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!