google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरायांचे विचार अंगीकारा

सपोनि शेळके यांचे प्रतिपादन; पानेगांव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : तालुक्यातील पानेगांव येथे 394 वी शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष शेळके यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हार नारळ वाढवून पूजन करण्यात आले. या निमित्ताने युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सुरुवातीला जेष्ठ नागरिक सुर्यभान गुडधे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. 
              जीवनात यशस्वी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकारा. 100% यश तर नक्कीच मिळणार. लोकशाहीमध्ये चांगला माणूस म्हणून जगण्याचा आनंद ही मिळेल. त्याच बरोबर युवकांनी शिक्षणाचा पाया भक्कम केला पाहिजे. स्पर्धेच्या युगात झोकून काम केलं तर प्रशासनात काम करण्याची संधी उपलब्ध होईल. आपल्या स्वतःच्या जीवनात आमुलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही. शिवरायांनी सर्व समाजाला बरोबर घेवून स्वराज्याची स्थापना केली. आजही प्रत्येकाच्या हृदयात छत्रपतींना स्थान आहे. पानेगांवातील विविध विकासकामांचे कौतुक शेळके यांनी करुन नुतन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्याचबरोबर भक्त निवास काम बघून आनंद वाटला असे शेळके यांनी सांगितले. प्रत्येक सामाजिक धार्मिक कामात मी उपस्थित राहील. 
             मा. लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, आ. शंकरराव गडाख तसेच लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांनी गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याने शक्य झालं असल्याचं सांगितलं. तालुकाभरातून शिवप्रेमी भक्तांनी सकाळपासून गर्दी केली. छावा संघटनेचे अध्यक्ष सुभाष जंगले, मा. लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, सरपंच निकीता भोसले, उपसरपंच दत्तात्रय घोलप, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे, मंडल अधिकारी प्रशांत कांबळे, मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, राजेंद्र जंगले, साहेबराव जंगले, भाऊसाहेब वाघ, संजय पवार, सुनिल भवार, नामदेव शेलार, मा. उपसरपंच रामराजे जंगले, विशाल जंगले, शिवशक्तीचे अध्यक्ष सुरज जंगले, बाबाराजे गुडधे, गणेश चिंधे, मा. सरपंच हौशाबापू जंगले, पाराजी गुडधे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले, छत्रपती प्रतिष्ठानचे हितेश जंगले गुड्डू जंगले, शुभम जंगले, विजय कापसे, गणेश जंगले, जनार्दन गागरे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल जंगले, बाळासाहेब कल्हापूरे, अशोक गागरे, शिवाजी जंगले, रोहिदास चिंधे, नवनाथ जंगले, बाबासाहेब शेंडगे, सुनिल जंगले, सतिश जंगले, संदिप जंगले, सुजित नवगिरे, कडूबाळ काकडे, भाऊसाहेब काकडे, रघूनाथ जंगले, भारत जंगले, बबन जंगले, सुभाष गुडधे आदींसह शिवप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!