
स्वराज न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी केंद्राने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची कपात केली.
लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या किमतींमध्ये नुकत्याच झालेल्या कपातीमुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर प्रत्येकी 2 रुपयांनी कमी केले आहे. 15 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून संपूर्ण देशभरात पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती लागू होतील.
X वरील एका पोस्टमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय आहे.”