नोकरी
अखेर देवळाली प्रवरेला मिळाले नवे मुख्याधिकारी
अप्पासाहेब ढूस यांचा पाठपुरावा; प्रहारच्या गांधीगिरीला यश

स्वराज न्यूज नेटवर्क
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगरपरिषदेला स्थायी मुख्याधिकारी मिळावेत, यासाठी कित्येक दिवसांपासून देवळाली प्रवरा येथील नागरिकांची मागणी होती. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनेही मुख्याधिकारी यांचे बंद दालनाला पुष्पहार घालून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्यासाठी नुकतीच गांधीगिरी करण्यात आली होती.
या गांधीगिरीनंतर प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अप्पासाहेब ढूस यांचे मागणीवरून याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक ना. बच्चुभाऊ कडू यांच्याशी जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांनी या प्रश्नावर समक्ष चर्चा केली होती.

प्रहारच्या त्या गांधीगिरीला व बच्चुभाऊ कडू यांनी मुख्यमंत्री महोदयांसोबत केलेल्या चर्चेला यश आले असून 14 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाकडून शेवगावचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांची देवळाली प्रवरा येथील मुख्याधिकारी पदाच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत.
यामुळे देवळाली प्रवरा येथील नागरिकांची कित्येक दिवसांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणे बाबत असलेली मागणी पूर्ण झाली असून प्रहारच्या गांधीगिरीला यश आल्याने देवळाली प्रवरा येथील नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.