google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगराजकिय

नगर मतदारसंघात 36 नामनिर्देशन अर्ज वैध

6 उमेदवारांचे अर्ज अवैध

                                      स्वराज न्यूज नेटवर्क           
     
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असुन 6 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
                 जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात हनुमंत देविदास पावणे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), शेळके विश्वजनाथ श्रीरंग (अपक्ष), पानसरे छगन भिकाजी (अपक्ष) व प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट  कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले आहेत.
नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेले 36 उमेदवार –
         उमेदवारांना सोमवार, दि. 29 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. 13 मे  रोजी अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणूकीचा निकाल मंगळवार दि. 4 जून रोजी जाहिर करण्यात येणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!