
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. महायुतीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेले भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपला अर्ज कायम ठेवला असून ते प्रहार पक्षाकडून नशीब आजमावत आहेत.
नेवाशात शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार शंकरराव गडाख, शिवसेनेचे (शिंदे गट) विठ्ठलराव लंघे, प्रहार जनशक्तीचे बाळासाहेब मुरकुटे या प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार (अजित पवार गट) अब्दुल शेख यांच्यासोबत 12 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
नेवासा विधानसभेसाठी 24 उमेदवारांनी 33 अर्ज भरले होते. त्यापैकी छाननीच्या दिवशी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे भाजप व शिवसेनेकडून भरलेली उमेदवारी अर्ज ए बी फॉर्म नसल्याने बाद झाले होते. त्यामुळे शंकरराव यशवंतराव गडाख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विठ्ठलराव वकीलराव लंघे (शिवसेना) बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (प्रहार जनशक्ती) अब्दुल लालाभाई शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) पोपटराव रामभाऊ सरोदे (वंचित बहुजन आघाडी) शशिकांत भागवत मतकर (राष्ट्रीय समाज पक्ष) हरिभाऊ बहिरू चक्रनारायण (बहुजन समाज पार्टी) संतोष नानासाहेब काळे (अपक्ष) कांबळे ज्ञानदेव लक्ष्मण (अपक्ष) मुकुंद तुकाराम अभंग (अपक्ष) अजित बबनराव काळे (अपक्ष) ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष) वसंत पुंजारी कांगणे (अपक्ष) जगन्नाथ माधव कोरडे (अपक्ष) प्रभाकर दरंदले (अपक्ष) सचिन मदनलाल देसरडा (अपक्ष) ऋषिकेश वसंत शेटे (अपक्ष) रविराज तुकाराम गडाख (अपक्ष) गोरक्षनाथ पंढरीनाथ कापसे (अपक्ष) रामदास रावसाहेब चव्हाण (अपक्ष) शरद बाबुराव माघाडे (अपक्ष) सुनिता शंकरराव गडाख (अपक्ष) आशाताई दादासाहेब मुरकुटे (अपक्ष) रत्नमाला विठ्ठलराव लंके (अपक्ष) या उमेदवारांची एकूण 31 उमेदवारी अर्ज शिल्लक होते.
सोमवार दि. 4 रोजी कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. दरम्यान मतदार संघातून तब्बल 12 जणांनी माघार घेतली. यामध्ये अब्दुल शेख (राष्ट्रवादी), सुनीता गडाख, रत्नमाला लंघे, आशाबाई मुरकुटे, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, शशिकांत मतकर,(रा. स. प), अजित काळे, गोरक्षनाथ कापसे, रामदास चव्हाण, रविराज गडाख, संतोष काळे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
नेवासा विधानसभा मतदारसंघ उमेदवार व त्यांचे चिन्ह
शंकरराव गडाख (मशाल)
विठ्ठलराव लंघे (धनुष्य बाण )
बाळासाहेब मुरकुटे (बॅट )
हरिभाऊ चक्रनारायण (हत्ती )
पोपटराव सरोदे (गॅस सिलेंडर )
अपक्ष उमेदवार
ज्ञानदेव कांबळे (कपाट )
मुंकुंद अभंग ( ग्रामोफोन)
ज्ञानेश्वर पाडळे (सफरचंद)
वसंत कांगुणे ( चिमणी )
सचिन दरंदले (बॅट्समन)
जगन्नाथ कोरडे (बॅटरी )
शरद माघाडे (ट्रम्पेट )