नोकरी
पोलीस पाटील संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानदेव कळमकर तर नेवासा तालुका अध्यक्षपदी रमेश डोळे
संघटनेच्या बैठकीत निवडी घोषित

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानदेव कळमकर तर नेवासा तालुका अध्यक्षपदी रमेश डोळे पाटील यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब पाटील शिंदे व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य कारणी सदस्य अँड. सयाराम बानकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी सभागृह, अहिल्यानगर येथे बैठक पार पडली. यावेळी सर्वांनुमते ज्ञानदेव कळमकर यांची अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष तर रमेश डोळे नेवासा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी अहिल्यानगरचे चंद्रकांत खजिनदार, दिलीप गायकवाड, संजय दहिफळे, प्रसाद गायकवाड, संजय वाकचौरे, विठठल चांगुलपाई, आदिनाथ मते, रामदास जाधव, अरुण होले, संजय काळोखे, दिलीप फंड, भगवान कदम, संतोष जाधव, संतोष खराड, जयसिंग काळे, अंबादास देवकर, रमेश रासकर, किसन पारधे आदीसह अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस पाटील मोठया संख्येने उपस्थित होते.