google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवासा येथील आठवडे बाजार बंद!

नगरपंचायत निवडणुक मतमोजणी; उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणा-या नगरपंचायत निवडणुक कार्यक्रम अंतर्गत नेवासा नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवार (दि. 21) रोजी प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. त्यामुळे नेवासा येथील साप्ताहिक बाजार बंद असणार आहे. 
            या संदर्भात अहिल्यानगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी जारी केलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, ज्याअर्थी, माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत नगरपंचायत  नगरपरीषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम मा.राज्य निवडणुक आयोग यांनी जाहिर केले आहे. त्यानुसार नेवासा नगरपंचायत निवडणुकांसाठी दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी व आठवडे बाजार किंवा स्थानिक बाजार एकाच दिवशी असल्यास सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी नेवासा नगरपंचायत हद्द येथील दि. 21 रोजीचा स्थानिक बाजार व आठवडे बाजार बंद ठेवणेबाबत आवश्यकता आहे.
                   त्याअर्थी, मी, सुधीर पाटील, उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर भाग अहिल्यानगर मला मा. जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांचेकडील आदेशान्वये मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन नेवासा नगरपंचायत हद्द, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील दि.21/12/2025 रोजीचा स्थानिक बाजार व आठवडे बाजार बंद ठेवणेबाबत आदेश पारीत करीत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!