
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : येथील भगवान मोहिनीराज महाराजांची यात्रा दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडत आहे. सदर यात्रेकरता महाराष्ट्र भरातुन भाविक दर्शनासाठी येत असतात. नेवासा तालुक्यातील आठवडे बाजार पैकी नेवासा खुर्द येथे मोठा बाजार हा दर रविवारच्या दिवशी भरवला जातो. सदरचा आठवडे बाजार हा यात्रा कालावधीमध्ये दिनांक 08/02/2026 असल्याने व आठवडे बाजार तळामध्ये आनंद मेळावा (रहाट पाळणे) असल्याने आठवडे बाजारासाठीच्या भाजीपाला, खाऊचे स्टॉल या करता जागेची कमतरता असल्याने दिनांक 08/02/2026 रोजीचा आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत पोलीस निरीक्षक नेवासा विनंती केली होती.
सदर यात्रेस महाराष्ट्रभरातुन भाविक दर्शनासाठी येत असल्याने त्यादिवशी वाहनांची आणि भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेवासा खुर्द येथे रविवार दि. 08 रोजी आठवडे बाजारामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील बाबींचा विचार करता श्री भगवान मोहिनीराज माहाराजांची यात्रा सुरळीत पार पाडणेसाठी रविवार दि.08/02/2026 रोजी नेवासा खुर्द गावाचे आठवडे बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्याचा निर्णय मार्केट अॅड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन सुधीर पाटील, उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी घेतला आहे.



