google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

प्रवासादरम्यान चोरी करणारी टोळी जेरबंद

साडेतेरा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत; नेवासा येथील घटना; नगर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

                                       स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : बस स्थानक, बस स्थानक परिसर आणि प्रवासादरम्यान चोरी करणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून सुमारे 13 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
          प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी अर्चना अंबादास थोरात वय-४६ वर्षे रा. नाशिक व त्यांची बहिण अशा नेवासा फाटा येथुन नेवासा येथे ऑटो रिक्षामधुन येत असताना त्यांच्या जवळील दोन महिलांनी त्यांचे सामानाच्या बॅगमधील पर्स त्यामधील रु. दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. १२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
          नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केलेले आहे.
           सदर आदेशानुसार पोनि किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली चोरीचे गुन्हा उघडकीस आणणेकामी सपोनि/ हरिष भोये, पोउपनि महादेव गुट्टे पोलीस अंमलदार दिपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, अतुल लोटके, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भगवान थोरात, सुनिल मालणकर, किशोर शिरसाद, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, वंदना मोढवे, चिमा काळे, ज्योती शिंदे, सुवर्णा गोडसे, चालक महादेव भांड, उमाकांत गावडे, अर्जुन बडे तसेच महिला पोलीस अंमलदार छाया माळी, प्रभावती कोकाटे, कल्याणी आव्हाड, सीसीटीव्ही कक्ष यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.
         वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन, अशा प्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपीची माहिती संकलित करुन आरोपींची माहिती काढत असतांना पथकास व्यवसायिक कौशल्य व गुप्त बातमीदारामाचे मार्फत सदरचा गुन्हा हा रेकार्डवरील महिला आरोपी नामे भाग्यश्री भोसले, रा. घोटण, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर हिने तिच्या साथीदारासह केला असुन ती नेवासा फाटा, ता. नेवासा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तात्काळ नेवासा फाटा येथे जावुन सापळा रचुन शिताफीने, त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे भाग्यश्री सुनिल भोसले उर्फ भाग्यश्री जगदिश काळे, वय २३ वर्षे, रा. घोटण, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर, नगिना सतिष भोसले वय २२ वर्षे, रा. शिरुर कासार, जि.बीड, हल्ली रा. पाथडी रोड, शेवगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर, सुरेखा राऊत चव्हाण, वय १९ वर्षे, रा. टाकरवण ता. माजलगांव, जि.बीड असे असल्याचे सांगितले. वरील महिला आरोपी यांना गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा आम्ही तिघीनी मिळून केले असल्याची कबुली दिली.
          आरोपीचे सांगणे प्रमाणे रु. १३,५०,०००/- किचे ९० ग्रॅम वजनाचे ७ सोन्याचे लगड एकुण रुपये १३,५०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीने अशाप्रकारचे आणखी इतर गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास करता आरोपीकडुन विविध 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.
               आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे, पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे, लोणी पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे तर कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे एक गुन्हा असे एकूण दहा गुन्हे असल्याचे आढळून आले आहेत. नमुद आरोपी यांचे विरुध्द अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथे यापुर्वी सुध्दा गुन्हे दाखल आहेत.
           ताब्यातील आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. नमुद आरोर्पाकडुन इतर चोरीबाबतचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!