ब्रेकिंग
नागरिकांनी सायबर सुरक्षिततेबाबत सजग असावे
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे प्रतिपादन; सायबर सुरक्षेची गरज केली व्यक्त; सेंट मेरीज स्कूल येथे पालक-शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न

स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : मुलांचे किशोरवयातील विश्व बदलत असते. यावर रागावणे किंवा मारणे हा पर्याय नसून अशा मुलांचे समुपदेशन केंद्रातून समुपदेशन करण्याचा सल्ला नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी उपस्थित पालकांना दिला. सेंट मेरीज स्कूल येथे पालक-शिक्षक संघाच्या सहविचार सभेत बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती संदर्भातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना धनंजय जाधव म्हणाले की किशोरवयात लैंगिक आकर्षण वाटणे गैर नाही परंतु सोशल मीडियाच्या व्याप्तीमध्ये मुले वाहत जातात. त्यात त्यांची फसगत होण्याची शक्यता जास्त असते. मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यातूनच त्यांना मोबाईल हाताळण्याची सवय लागते. किशोरवयीन मुलाची चांगली मैत्रीण ही त्याची बहीण व आई होऊ शकते तर मुलींचे चांगला मित्र हा तिचा मोठा भाऊ किंवा वडील बनू शकता. यावेळी जाधव यांनी उपस्थित पालकांना सायबर सुरक्षेचे महत्त्व समजून सांगितले. यामध्ये मोबाईलची अनोळखी लिंक न उघडणे तसेच अनोळखी व्यक्तीशी फोनवर न बोलणे, आर्थिक व्यवहार न करणे हा सायबर गुन्हे थांबवण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले. या उपक्रमास पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक विजय लोंढे व संदीप सरोदे यांनी केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योतिस, शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर मारिया, कार्यालय प्रमुख सिस्टर लिसा, सिस्टर मुक्ता यांच्यासह सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.



