google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

गुंजाळे येथील वेश्या व्यवसायावर छापा

तीन परप्रांतीय मुलींची सुटका, एक आरोपी ताब्यात; पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

                              स्वराज न्यूज नेटवर्क
नगर विशेष प्रतिनिधी : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना वांबोरी ते नगर जाणारे रोडवर गुंजाळे गावचे परिसरात एका शेतात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यावरून सदर ठिकाणी  बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली.
  
          पो.कॉ रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  आरोपी रवि उर्फ संजय राजू गायकवाड रा. गुंजाळे ता. राहुरी याचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन  गु.र.न.122/2023 महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वांबोरी परिसरातील व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

          सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, स.फौ. अकोलकर, पोहेकॉ. चंद्रकांत ब-हाटे, पोना पारधी, मपोना कोहकडे, पोकॉ ताजणे, शिंदे, साखरे, नदीम शेख, ठोंबरे आदींनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!