आरोग्य व शिक्षण
नेवासा येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा
जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र पवार तर तालुकाध्यक्षपदी कमलेश गायकवाड
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा फाटा येथे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी आणि नेवासा तालुका मानवाधिकार संघटनेच्या वतीने आज मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नेवासा : नेवासा फाटा येथे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी आणि नेवासा तालुका मानवाधिकार संघटनेच्या वतीने आज मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा मानवाधिकार संस्थेचे जिल्हा सहअध्यक्ष तथा जनरल सेक्रेटरी सचिन धस, तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील घुमरे, कमलेश गायकवाड आदींच्या उपस्थितीत मानव अधिकार संस्थेचे ध्येय, उद्दिष्ट आणि कार्य याचा परिचय महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे संचालक व अहमदनगर जिल्हा मानव अधिकार संघटनेचे अहमदनगर जिल्हा सहअध्यक्ष तथा जनरल सेक्रेटरी सचिन धस यांनी उपस्थितांना करून दिला. उपाध्यक्ष रावसाहेब घुमरे यांनी अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत मानव अधिकार संस्थेने केलेल्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात नवीन कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र पवार यांची निवड तर राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष पदासाठी म्हणून रावसाहेब घुमरे पाटील तर नेवासा तालुका अध्यक्ष पदासाठी कमलेश गायकवाड यांचे नाव सुचवण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी मानले.