क्रिडा व मनोरंजन
नेवासा येथे होमगार्ड वर्धापन दिन साजरा
76वा वर्धापन दिन; होमगार्ड पथकाने राबविले स्वच्छता अभियान
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा 76 वा वर्धापन दिन नेवासा होमगार्ड पथकाने कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून साजरा करण्यात आला. यावेळी परेडचे संचलनही करण्यात आले होते.
होमगार्डचे समादेशक बाळासाहेब देवखिळे तसेच डॉ. प्रमोद देवखिळे यांनी उपस्थित होमगार्ड जवानांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तहसील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी मा. समादेशक राजेंद्र बोरुडे, पलटण नायक नायक अशोक टेमकर, पलटण नायक श्रीकांत ससे, पलटण नायक दादासाहेब कणगरे, अनायुक्त अधिकारी उमेश इंगळे, अरुण देवढे, गफ्फार शेख, दिलीप पेचे, बाबासाहेब घोडेकर, शंकर जायगुडे, सर्जेराव जगधने, सचिन कात्रज, श्रीधर लिपणे, ज्ञानेश्वर मोटे, भागवत दरंदले, बाळासाहेब सावंत, किशोर शिंदे, प्रवीण वाल्हेकर, गणेश पेटे, महिला होमगार्ड प्रमिला श्रीखंडे, रुक्मिणी सरोदे, सरिता आगळे सुनंदा कवडे व मनीषा खादे आदी होमगार्ड जवान उपस्थित होते.
↔महाराष्ट्रात 6 डिसेंबर 1946 रोजी मोरारजी देसाई यांनी होमगार्ड संघटनेची स्थापना केली होती. जिचे ब्रीदवाक्य ‘निष्काम सेवा’ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 46 हजार 254 होमगार्ड जवान कार्यरत आहेत. जे संकटकालीन परिस्थिती, सण, उत्सवात पोलीस दलाबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात.