google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

नेवासा एसटी आगारात सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन

एसटी चालकांनी विना अपघात सेवा द्यावी; प्रवासी संघटनेचे अनिल ताके यांचे आवाहन

                             स्वराज न्यूज नेटवर्क
 नेवासा : एसटीच्या चालकांनी विना अपघात सेवा देऊन आपल्या आगाराचे नाव उज्वल करावे,  असे आवाहन नेवासा तालुका प्रवासी संघटना अध्यक्ष युवा नेते अनिल ताके यांनी केले.
            महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नेवासा आगारात सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटन युवा नेते अनिल ताके यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या वंदना दीदी, मयुरी दीदी, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोंबे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, आगार व्यवस्थापक किशोर अहिरराव, वरिष्ठ लेखापाल वासुदेव आव्हाड, डेपोचे पालक अधिकारी बाळासाहेब एकशिंगे, लेखाधिकारी संगीता होडगर, राकेश सोनवणे आदी उपस्थित होते.
            यावेळी उपस्थित कामगार व चालक वाहकांना मार्गदर्शन करताना अनिल ताके म्हणाले की, एसटीरुपी रथाचे चालक व वाहक ही दोन चाके असून, प्रवाशांची जीवनदायिनी ठरलेल्या एसटीतून प्रवासी वाहतूक करण्याचे ईश्वरी कार्य ते करत आहेत. आजपर्यंत सर्वात कमी अपघात एसटीचे झाले आहेत. बस चालक हे स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांना सुरक्षित पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळे एसटीने प्रवासी वर्गात एक विश्वासपूर्ण नाते तयार केले आहे. चालकांनी तणावपूर्ण परिस्थितीपासून दूर राहून निर्व्यसनीपणे विना अपघात सेवा दिल्यास महामंडळाला परम वैभव प्राप्त होईल, असेही ताके म्हणाले.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन वासुदेव आव्हाड यांनी केले तर आभार लेखाधिकारी संगीता होडगर यांनी मानले. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, वंदना दिदी, पोलीस उपनिरीक्षक विजय कोंबे, डेपो मॅनेजर किशोर अहिरराव, संगीता होडगर, डेपोचे पालक अधिकारी बाळासाहेब एकशिंगे यांचीही भाषणे झाली. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!