google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

नेवाशात महिला मंडळ अधिकाऱ्यांची कारवाई

अवैध गौणखनिज उपसा वाहतूक विरोधात मोहीम; सहा ब्रास मुरूमासह दोन डंपर जप्त

                       स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : अनधिकृत गौणखनिज उपसा व वाहतूकच्या विरोधात ‘मंडळ अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसात तालुक्यात दोन ठिकाणी कारवाई करत सहा ब्रास मुरूम मुद्देमालसह दोन डंपर जप्त केले. विशेष, म्हणजे या दोन्हीही कारवाई करण्यात महिला मंडळ अधिकारी आघाडीवर होत्या. 
              जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा खुर्द, घोडेगाव, सोनई, कुकाणे, सलाबतपूर, भानसहिवरे,  देडगाव, प्रवरासंगम, वडाळा बहिरोबासह सर्वच मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध गौणखनिज उपसा वाहतूक विरोधात नेवासे तालुक्यात मोहीम उघडली आहे.
       विशेष म्हणजे या दोन्हीही कारवाया महिला मंडळ अधिकारी सरिता मुंडे (भानसहिवरे) तृप्ती साळवे (कुकाणे),  व संगीता पुंड (सलाबतपूर) यांनी केल्या. त्यांना पथकातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
          या पथकाने अनाधिकृत गौण खनिज उपसा व वाहतुकीच्या विरोधात पहिली कारवाई मंगळवार दि. 24 रोजी सायंकाळी खड्का फाटा परिसरात केली असून त्यात चार ब्रास मुरूमासह एक वाहन ताब्यात घेतले आहे. तर दुसरी कारवाई दि. 25 रोजी उस्थळ दुमाला हद्दीत करत त्यात दोन ब्रास मुरूमसह वाहन जप्त केले आहे. ही दोन्ही वाहने पथकाने ताब्यात घेत तहसीलदार निवास परिसरात जमा करण्यात आली आहेत. यावेळी विनायक गोरे, मंडलाधिकारी फिरोज सय्यद, गव्हाणे उपस्थित होते.
कारवाईत सातत्य ठेवणार
मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने दोन वाहनांवर कारवाई केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधात महसूल विभागाची कारवाईत सातत्य ठेवणार असून मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे नेवासाचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी सांगितले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!