आरोग्य व शिक्षण
सेंट मेरीज शाळेचा 100% निकाल
100% निकालाचे सलग 20 वे वर्ष; सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : अहिल्यानगर येथील सेंट मेरीज स्कूलचा सलग 20 वर्षे 100 टक्के निकाल देण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. शाळेची विद्यार्थिनी अनुष्का अविदत्त कर्जुले हिने 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. रुतुजा सोपान खाटीक 95 टक्के गुणांसह द्वितीय तर आरती भाऊसाहेब मंडलिक व धनिष्ठा शंकर भैरट 94.80 गुणांसह संयुक्त तृतीय क्रमांकावर राहिल्या.

या परीक्षेसाठी शाळेतील एकूण 113 विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी 71 विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले. इतर 16 विद्यार्थी प्रथम श्रेणी पात्रतेसह गुणतालिकेत अव्वल आले. शाळेतील 26 विद्यार्थी 90 टक्क्यांहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सिस्टर जोसी, व्यवस्थापिका सिस्टर मौली, सिस्टर लिसा, शिक्षक विजय लोंढे, संदीप सरोदे, रमेश निमसे, सकिना शेख, प्रशांत गायकवाड, विष्णू खांदोडे, स्वाती पाटील, तृप्ती कुटे, मुबिना शेख, मंजुषा साळवे आदींनी मार्गदर्शन केले.
परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे मास्टर सुरेश लव्हाटे, सुशीला लोंढे, रेश्मा लोखंडे, सनाकौसर शेख, संगीता पंडित, सोनाली कालाणे, शबाना शेख, वैशाली साळवे, वंदना वाघमारे, योगिनी बनगर, सुप्रिया हुसळे, येशुदास शहाराव, बाळासाहेब साळवे, सत्यदान गायकवाड, जॉन मकासरे, अँलेस मगर यांनी अभिनंदन केले आहे.