गुन्हेगारी
खून झाल्याची ‘112’ ला खोटी माहिती!
रामडोह येथील इसम गजाआड; नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नागरिकांच्या अडचणीच्या वेळी हेल्पलाइन नंबर असलेल्या डायल 112 वर फोन करून गावात खून झाल्याची खोटी माहिती देणार्या रामडोह येथील इसमावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा : नागरिकांच्या अडचणीच्या वेळी हेल्पलाइन नंबर असलेल्या डायल 112 वर फोन करून गावात खून झाल्याची खोटी माहिती देणार्या रामडोह येथील इसमावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 7.49 वाजता डायल 112 वर तुकाराम नावाने मोबाईल क्र. 7620197893 वरुन कॉल आला कि वरखेड गावामध्ये खुन झाला आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक विजय करे यांचे आदेशावरुन सदर ठिकाणी पोसई मोंढे, पोना संजय माने, पोना अशोक कुदळे असे वरखेड ता. नेवासा येथे गेल्यावर सदर इसमाचे नाव तुकाराम गोरे व तो रामडोह येथील असलेबाबत माहती मिळाली.
पोलीस पथक रामडोह येथे कॉलर तुकाराम गोरे याचे राहते घरी गेले असता तेथे कोणत्याही प्रकारचा खून अथवा गुन्हा घडलेला नव्हता. त्यावेळी तेथे हजर असलेल्या इसमास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव तुकाराम बाबुराव गोरे रा. रामडोह असे असलेचे सांगितले. त्याच्या तोंडाचा आंबट उग्र वास येत होता. त्यास डायल 112 च्या कॉलबाबत विचारपूस केली असता त्याने त्याने मी डायल 112 ला खोटा कॉल केला असलेबाबत सांगितले. कॉलर तुकाराम गोरे हा दारुच्या नशेत असल्याने त्यास ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारुच्या नशेत असलेबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे.
डायल 112 वर वरखेड गावामध्ये खून झाला आहे अशी खोटी माहिती देणारा आरोपी तुकाराम बाबुराव गोरे (वय 29 वर्षे) रा. वरखेड ता. नेवासा याचे विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गुरनं. 73/2023 भारतीय दंड विधान कलम 177 सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85-1 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.