
स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे.
मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास 500 शब्दांच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे दि. 19 जानेवारीपर्यंत mscbcpune2@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.