google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना

सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : राज्य शासनाच्या महसुल व वन विभागामार्फत संपुर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 राबविण्यात येत असुन या योजनेच्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन सह जिल्हा निबंधक शरद झोटींग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.  
               मुद्रांक शुल्क अभय योजना 1 डिसेंबर, 2023 ते 31 मार्च, 2024 या कालावधीत दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा 1 डिसेंबर, 2023 ते 31 जानेवारी, 2024 व दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी, 2024 ते 31 मार्च, 2024 असा असणार आहे. काही कारणास्तव पहिल्या टप्प्यात सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. 
             मुद्रांक शुल्क अभय योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यासह नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अभय योजनेसाठी अर्जदार यांना संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. योजनेची सविस्तर माहिती विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने-परिपत्रक-मुद्रांक अभय योजना या सदराखाली उपलब्ध आहे. 
            मुद्रांक शुल्क अभय योजनेमध्ये सहभागी होऊन मुद्रांक शुल्क व दंडामध्ये मिळणाऱ्या भरघोस अशा सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी संबंधित जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाशी अथवा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कॉल सेंटर क्र. 8888007777 येथे संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!