मुस्लिम बांधवांकडून अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध
नेवासा येथे व्यक्त केला निषेध; मौलाना जुनेद यांनी केले संबोधित

यावेळी मौलाना जुनेद यांनी सांगितले की, आम्ही सर्व बांधव पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो. इस्लाम धर्म कोणाही निरपराध व्यक्तीच्या हत्येची परवानगी देत नाही. पवित्र कुराणांमध्ये नमूद आहे की कोणत्याही निरपराध व्यक्तीची हत्या ही संपूर्ण मानवतेची हत्या आहे. जर आपण कोणा निरपराधाचा जीव वाचवला तर पूर्ण मानवतेचा जीव वाचवल्यासारखा आहे. नाहक हत्या करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आतंकवादाचा कोणताही धर्म नसतो. या घटनेचा हिंदू बांधवांबरोबर आमचे मुस्लिम बांधवही या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत. ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना सरकारने कठोर शिक्षा करावी, असे यावेळी यांनी नमूद केले. यावेळी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.