google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

नेवाशात भटक्या कुत्र्यांनी निर्माण केली दहशत

सात महिन्यांत 306 नागरिकांना अँटी रेबीज लस; नेवासा नगरपंचायत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार; मोकाट कुत्रे पकडण्याची निविदा मंजूर

                                      स्वराज न्यूज नेटवर्क 
नेवासा : नेवासा खुर्द परिसरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांची झोप उडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नेवासा खुर्द येथे १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत एकूण ३०६ नागरिकांना रेबीजविरोधी लस देण्यात आली आहे. यावरून समस्येचे गांभीर्य दिसून येते.
               नेवासा खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १ जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यात ३०६ नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.
          रेबीज प्रतिबंधक लस प्रामुख्याने कुत्रा, मांजर, माकड यांच्या चावण्यामुळे दिली जाते. या कालावधीत महिन्यानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. जानेवारीत ५९, फेब्रुवारी ५१, मार्च ४३, एप्रिल ३५, मे २६, जून ४१ तर जुलैमध्ये ५१ जणांना रेबीज प्रतिबंधक लस (एआरव्ही) पहिला डोस देण्यात आला असून, एकूण ३०६ प्रकरणे नोंदविण्यात आली
                 ही आकडेवारी नेवासा खुर्द परिसरात भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये होत असलेल्या वाढीबद्दल गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना विशेषतः या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नेवासा नगरपंचायतने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे? शहरातील कचरा व्यवस्थापन, जे भटक्या प्राण्यांना आकर्षित करते, त्यावर काही उपाय झाले आहेत का? नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी कोणते कार्यक्रम घेण्यात आले आहेत? श्वानदंश झाल्यास तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन किंवा शहरातील इतर उपचार केंद्रांची उपलब्धता कितपत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं नागरिकांना हवी आहेत. नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
             भटक्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यात नगर पंचायत अपयशी ठरली आहे. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा धोका आणखी गंभीर बनला आहे. नगर पंचायत प्रशासनाने या विषयावर तातडीने आणि ठोस पावले उचलावीत असे नागरिकांचे म्हणणे आहे. मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त असून, स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीयाने लक्ष देण्याची गरज आहे. नेवासा नगरपंचायतीने अजुन जास्त घटना घडू नये, यासाठी लवकरात लवकर कार्यवाही केली पाहिजे.
मोकाट कुत्रे पकडून त्यांचे लसीकरण करण्याची निविदा मंजूर 
नेवासा नगरपंचायतने नेवासा नगरपंचायत हद्दीतील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे पशुवैद्यकीय अधिकारी नेवासा यांचे मार्फत लसीकरण करण्याबाबत निविदा मंजूर करण्यात आली आहे. यासाठी नगरपंचायतने दि. 28 जानेवारी 2025 रोजी ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील मे. कल्पक बहुउद्देशीय संस्थेला हे काम देण्यात आले आहे. सदर कामाची मुदत 7 जुलै 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत ठरवून देण्यात आली आहे. तरी अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही दिसून येत नाही.
जनतेने दिलेला इशारा
    आम आदमी पक्षाचे नेवासा तालुका अध्यक्ष अ‍ॅड. सादिक शिलेदार यांनी इशारा दिला आहे की जर नगर पंचायत प्रशासनाने लवकर कारवाई झाली नाही, तर आम्ही मुख्याधिकारी कार्यालयात भटक्या कुत्र्यांना सोडून निषेध करू. या इशाऱ्यानंतर, शहर प्रशासन या गंभीर सार्वजनिक आरोग्य संकटावर किती लवकर आणि प्रभावीपणे कारवाई करते हे पाहणे बाकी आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!