google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

सेविकेस पाच तर मदतनीस तीन हजारांची वाढ; इन्सेंटिव्हही मिळणार, शासन निर्णय जारी

                                    स्वराज न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये 38 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला असून अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

          मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागणीला यश आले असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मानधन वाढिवर शिक्कामोर्तब झाले आहे. याच बरोबर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना इन्सेंटिव्हदेखील मिळणार असल्याने ऐन नवरात्रीच्या पर्वावर अंगणवाडी सेविकांना डबल भेट मिळाली आहे.

         आदिती तटकरे म्हणाल्या की, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनात साधारण 50 टक्के वाढ आम्ही केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

      अंगणवाडी मदतनीस यांना 3 हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते. त्यात आता 5 हजार अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस 3 हजार वाढवले होते. मात्र, आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

इन्सेंटिव्ह देखील मिळणार

ना. आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!